'भरारी' संस्था 'भरारी' चे सेवाव्रत अधिक माहिती अपेक्षित सहभाग संपर्क साधा

 

   'भरारी' चे नुकतेच संपन्न झालेले उपक्रम  

आम्हाला दया नको... हवा आहे फक्त सहकार्याचा एक हात आणि पाठीवर प्रोत्साहनाची थाप! या भावनेतून 'भरारी' सातत्याने विविध उपक्रम राबवित असते. भरारीच्या नुकत्याच संपन्न झालेल्या उपक्रमांविषयी...

 

वर्धापन दिन

संस्थेचा 17 वा वर्धापन दिन यंदा डोंबिवली (पूर्व) येथील स्वयंवर सभागृहात रविवार दिनांक 15 डिसेंबर 2013 रोजी दुपारी 2 ते रात्रौ 10 या वेळेत संपन्न झाला. सुरुवातीला भरारीच्या सदस्यांच्या काही खेळांच्या स्पर्धा झाल्या. ह्या वर्षीची उल्लेखनीय बाब म्हणजे या वर्षी संस्थेच्या अपंगालय-ज्येष्ठालयामधील अगदी नव्वदीच्या सदस्यांनीही स्पर्धांमध्ये भाग घेतला.

अल्पोपहारानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात;

  • आदीश मालवणकर, मनाली आपटे या भरारीच्या सदस्यांनी नृत्य पेश केले.

  • क्षितिज, डोंबिवली () रोटरी स्कूल, डोंबिवली (पूर्व) या शाळेमधील मतीमंद कर्णबधीर मुलांनीही नृत्य पेश केले.

  • सौ.मनिषा दीक्षित, सौ.सुनिती कोपरकर, सौ.श्वेता रानडे सौ.अपर्णा मोडक यांच्या काव्य वाचनाचा लोकप्रिय कार्यक्रम झाला.

  • ज्येष्ठालयातील पाच आज्या मेहेंदळे, जोशी, साठे, देसाई ठाणेदार यांनी कविता वाचन, नकला गायन सादर केले.

या वर्षी संस्थेच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली प्रसिध्द उद्योजक ठाणे जिल्हा होलसेल मर्चंट असोसिएशनचे वरीष्ठ उपाध्यक्ष, एल.डी.सोनावणे कॉलेज, कल्याणचे ट्रस्टी उपाध्यक्ष मानवी कॅलेंडर अशी अफलातून ओळख असलेले श्री.शांताराम भोईर यांनी प्रमुख पाहूणे म्हणून इंटिरियर मॉड्यूलर किचन बनवणारे व्यावसायिक फाईन आर्टिस्ट श्री.निलेश साव यांनी अध्यक्ष म्हणून. खोणी येथील 'घरकुल' या मतीमंद मुलांच्या निवासी संस्थेचे संस्थापक चालक श्री.अविनाश बर्वे हेही विशेष अतिथी म्हणून वर्धापन दिनी उपस्थित होते आणि भरारीची या वर्षीची सत्कार मूर्ती होती, रोशनी पाटेकर जिने वयाच्या 13 व्या वर्षी अपघातात आई-वडील एक पाय गमावला पण जिद्दीने स्वत:चे आयुष्य घडवले. आज तिच्याकडे मानाची नोकरी, स्वत:चे घर, चारचाकी गाडी या साऱ्या गोष्टी तर आहेतच पण ती एक पारितोषिक विजेती कर्मचारी आणि तत्पर समाजसेविकाही आहे.

या सर्वांनी दीप प्रज्वलन करून मुख्य कार्यक्रमाची सुरुवात केली. या मुख्य कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष विनायक मालवणकर यांचा सर्वांशी संवाद, संस्थेच्या वर्षभरात झालेल्या वेगवेगळया उपक्रमात मदत करणारे कार्यकर्ते हितचिंतक यांचा ॠणनिर्देश, वेगवेगळया स्पर्धांमधील स्पर्धकांना बक्षीस वितरण याचा समावेश होता. तसेच विविध गरजू अपंगांना ट्रायसिकल्स, व्हीलचेअर, श्रवणयंत्र, शिवण मशीन तसेच अपंगांना स्टॉल उभारणीसाठी आर्थिक मदतही वितरित केली गेली. अपंगालयातील सेविका रंजना हिचा उत्कृष्ट सेविका म्हणून सत्कार केला गेला.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संस्थेने स्मरणिका प्रकाशित केली. या वर्षी स्मरणिकेची संकल्पना होती 'स्त्री भ्रुण हत्या रोखा'.   त्यामुळे संकल्पना सादरीकरणास भारतमाता येऊन मान्यवरांना स्मरणिका देते सांगते,

'मुलगी उदरी येता का वाटते चिंता,

खडतर मार्ग असता, तीच धरी हाता'

'लेक वाचवा, मुलगी ही होईल तुमचा आधार

मुलगीच करी सृष्टीचा उध्दार'

सर्व मान्यवरांनी संस्था, संस्थेचे उपक्रम यांचे कौतुक केले. श्री.शांताराम भोईर यांनी आपली ओळख मानवी कॅलेंडर म्हणजे काय याची झलक दाखवली. कुठल्याही दिवसाला तारीख, वार, महिना  साल या गोष्टी जोडलेल्या असतात. यातील कुठल्याही तीन गोष्टी सांगितल्या तर ते चौथी गोष्ट ओळखतात आणि ती ही 100 वर्षे या कालखंडातील.

यानंतर नाटयसंगीत गायिका कल्पिता खरे यांचा गाण्याचा कार्यक्रम झाला त्यात नाटयसंगीत, लावणी, भावगीत, सुगमसंगीत सादर झाले. त्यांना साथ दिली संस्थेचे सभासद विनायक मालवणकर, श्वेता रानडे, दिपाली ग्रीन अपर्णा मोडक यांनी. कार्यक्रमाची सांगता गीतांजली मालवणकर यांचे आभार प्रदर्शन, श्वेता रानडे यांचे पसायदान मेजवानीचा आस्वाद घेऊन झाली. याही वर्षी स्पर्धांचे आयोजन भावे मावशी यांनी, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृगा गोरे हिने बक्षिसांच्या नियोजनाची, स्मरणिका प्रकाशनाची जबाबदारी संध्या प्रधान यांनी पार पाडली. तसेच संस्थेचे प्रतिनिधी म्हणून संजीव मांद्रेकर वैद्यकाका यांनी निधी संकलन स्मरणिका वाटपाची जबाबदारी याही वर्षी चोख पार पाडली.

अशा प्रकारे संस्थेचा सतरावा वर्धापन दिन नाच, गाणी, कविता, खेळ, नकला, कौतुक, सत्कार मार्गदर्शन याबरोबर जोशात जल्लोषात संपन्न झाला.

              -- मृगा गोरे, डॉ.अंजली आपटे         

                                                                                

भजन संध्या

शनिवार दिनांक 21 डिसेंबर 2013 रोजी डोंबिवली एम.आय.डी.सी येथील शुभांगी निमकर यांच्या मार्गदर्शनाखाली 'पूजा भजनी मंडळ' यांनी दुपारी 4 ते 6 दरम्यान भजनाचा सुंदर कार्यक्रम केला. हे मंडळ 2005 पासून मंगळागौर, लग्नाची गाणी, पारंपारिक सणवार इत्यादी कार्यक्रम साजरे करतात. गजाननाच्या प्रार्थनेने सुरू झालेल्या कार्यक्रमात शिवस्तुती, पांडुरंगावर रचलेली अनेक संतांची कवने, दत्तात्रयाचे भक्तीगान सादर झाले. पुरुषोत्तम राजा, रामराय यांच्याही रसाळ कथा सादर झाल्या. अपंगालयातील काही आजी देखील संतांची कवने गात या कार्यक्रमात सहभागी झाल्या. साईबाबांवरील गाणी, देवीचा गोंधळ म्हणत सर्व संतांच्या पालखीचे अपंगालयात आगमन झाले आणि सरतेशेवटी भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. भजनी मंडळाला अल्पोपहाराने रजा दिली जाताना मंडळातील सदस्यांनी अपंगालयातील स्वयंपाकघर, पेशंटस् एकूणच स्वच्छता टापटिपीचे कौतुक केले.

-- मृगा गोरे, सीमा जोग

 

पोपटी

डिसेंबर जानेवारी महिना उजाडला की आजही ग्रामीण घाटावरील भागात जोरदार हुर्डा पाटर्यांना सुरूवात होते. पूर्वीच्या काळापासून शेतावर राखण करणा-या शेतक-यांनी थंडीच्या दिवसात खवळलेल्या जठराग्नीला शांत करण्यासाठी शेतातीलच ज्वारी, मका ही कणसे पेटवलेल्या शेकोटीत भाजून जवळच्या चटणी - दह्या बरोबर खायला सुरूवात केली जन्म झाला हुर्डा पाटर्यांचा. आज पुणे नगर जिल्ह्यात तर शहरी लोकांना आकर्षित करण्यासाठी या दिवसात अनेक रिसॉर्ट या हुर्डा पाटर्यांचे आयोजन करतात शहरी लोकही त्यावर तुटून पडतात.

घाटावर होणारया या हुर्डा पाटर्यांचं ऊत्तर कोकणातील स्वरूप म्हणजे ''पोपटी''. पांडव कालापासून या ''पोपटी'' चा उल्लेख अढळतो. रात्री राखणीचा शेतकरी थंडीपासून वाचण्यास शेकोटी पेटवतो, एका मडक्यात नुकत्याच तयार झालेल्या पिकांपैकी वाल, तूर, भुईमूग, कांदा, बटाटा, वांगी, रताळे, खडेमिठ औषधी भांबुर्डीचा पाला भरतो मडक्याचे तोंड बांधुन ते मडके शेकोटीत ठेवून देतो. थोडयाच वेळात भांबुर्डीच्या रसात शिजलेल्या गरमा गरम भाज्या तयार होतात.

        

काहीशी विस्मरणात गेलेली शहरी लोकांना अजिबात माहित नसलेली ही पोपटी डोंबिवलीत मात्र आवर्जुन साजरी होते. डोंबिवलीत गेल्या 17 वर्षांपासून कार्यरत असलेली, अपंगांनी अपंगांसाठी चालविलेली 'भरारी अस्थिव्यंग विकलांग संस्था', गेली 17 वर्षे या पोपटीचे आयोजन करते. संस्थेच्या या पोपटीत, संस्थेचे कार्यकर्ते, सभासद यांच्या बरोबरीने अनेक नामवंत नागरिकही हजेरी लावण्यास उत्सुक असतात. यावर्षी रविवार, दिनांक 26 जानेवारी 2014 रोजी, संस्थेच्या कार्यकारी संचालक डॉ.अंजली आपटे, यांच्या मिलापनगर येथिल बंगल्याच्या अंगणात हा कार्यक्रम रंगला होती. यावर्षी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती आपल्या राज्याच्या प्रसिद्ध महिला खो-खो पटू, MCA (महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन) च्या वुमेन्स् विंगच्या सेक्रेटरी इंडीया टुरिझमच्या गाईड हेमा फडके, टेलिव्हिजन क्षेत्रातील, ''मन उधाण वा-याचे'' या मालिकेत 'निरजा' ''उंच माझा झोका'' या मालिकेत 'ताईकाकू' साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिष्ठा राउत यांनी. तसेच संस्थेचे तहहयात सभासद शिवानी जोग-पटवर्धन निलेश पटवर्धन यांनी. शिवानी या मॉडेल / आर्टीस्ट कोऑर्डिनेटर म्हणून तर निलेश हे सुपरवायझिंग प्रोडयुसर म्हणून मिडीया क्षेत्रात कार्यरत आहेत.

संस्थेसाठी झटणा-या कार्यकर्त्यांचा श्रमपरिहार, भरारी परिवारात नव्याने सामिल झालेल्यांसाठी परिचय वाढवण्याची संधी, आमच्या संस्थेची अनऔपचारीक ओळख करून घेण्याचा अवसर हा तिहेरी हेतु साध्य करण्यासाठी संस्था दरवर्षी या पोपटीचे आयोजन करते करत राहणार. सुट्टी काढता, गावाकडे जाऊन शेतावर श्रमपरिहार केल्याचे समाधान संस्था या निमित्ताने देते सारेजण रिफ्रेश होउन पुन्हा नव्या जोमाने कामासाठी तयार होतात.  

-- मृगा गोरे, सुनिता महाडिक-देसाई

 मकरसंक्रांत 

बुधवार दिनांक 29 जानेवारी 2014 रोजी विष्णूनगर, डोंबिवली (पश्चिम) येथील संकल्प महिला मंडळाचे सदस्य तिळगुळ देऊन गप्पा मारण्यासाठी अपंगालयात 5.30 वाजता आले होते. 'दिगंबरा दिगंबरा' या भजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नंतर पेश केले गेले 'क्षणभर उघड नयन' हे गीत. देसाई आजी साठे आजींनी देखील गाणी म्हटली. यानंतर सर्वांना तीळगुळ वाटण्यात आला. अपंगालयातील बहुसंख्य रहिवाश्यांना लक्षात घेऊन आणलेला तीळगुळ छान मऊ होता. त्यामुळे सर्व आजी-आजोबा त्याचा आस्वाद घेऊ शकले.

मंडळाच्या अध्यक्षा सुधा मार्कंडे यांचे सर्वांतर्फे आभार मानण्यात आले. त्यांच्याबरोबर त्यांच्या मंडळाचे इतर सदस्य सुरेखा शुक्ल, कान्हेरे, सप्रे, सहस्त्रबुध्दे, लीला बापट, जोशी राठोड यांचेही आभार मानले.

-- मृगा गोरे, डॉ.अंजली आपटे

 

सन्मान सोहळा

रविवार दिनांक 9 मार्च 2014 रोजी, डोंबिवली येथील आंबेडकर सभागृहात 'भारतीय स्त्री शक्ती' या संस्थेच्या डोंबिवली शाखेने, महिला दिनाचे औचित्य साधून एक सन्मान सोहळा आयोजित केला होता. ही संस्था 1988 पासून कार्यरत आहे. महिलांच्या पुढाकाराने अथवा सहभागाने समाजात कार्यरत असणाऱ्या सहा संस्थांचा त्यातील सहभागी महिलांचा त्यावेळी सत्कार करण्यात आला. 'भरारी'तील ज्येष्ठ महिला कार्यकर्ती सचिव म्हणून श्रीमती उषा भावे यांनी तो स्वीकारला.  कवितेच्या रूपात प्रमाणपत्र, तुळशीचे रोप लक्ष्मीबाई टिळक यांचे 'स्मृतीचित्रे' हे पुस्तक त्यांना प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात 'जागर स्त्री शक्तीचा' हे प्रदर्शन, भारतीय स्त्री शक्तीतर्फे मांडण्यात आले होते फक्त 'भरारी'ला तेथे स्टॉल लावण्यास आमंत्रित केले होते.

या कार्यक्रमात संस्थेतर्फे संध्या प्रधान, डॉ.अंजली आपटे, मृगा गोरे, सीमा जोग सुनिता महाडीक-देसाई याही सहभागी झाल्या होत्या.

-- मृगा गोरे, उषा भावे

'भरारी' सेवक वर्गाची सामाजिक बांधिलकी

शुक्रवार दिनांक 21 मार्च 2014 रोजी भरारीच्या अपंगालयातील व्यवस्थापिका जयश्री बांदेकर हिने बऱ्याच जणांना फोन करून कळवले की, आज आम्ही एक वेगळा कार्यक्रम करणार आहोत त्यासाठी तुम्ही उपस्थित रहावे. साऱ्यांचे कुतुहल चाळवले. त्या दिवशी असलेली रंगपंचमी साजरी करणार असतील असेही वाटले. चार वाजता जेव्हा सगळे अपंगालयात पोहोचले तर सारे अपंगालय रांगोळया, फुले आणि फुगे यांनी सजले होते. सारे रहिवासी तयार नटून-थटून. गेल्यावर कळले की, डॉ. अंजली आपटे विनायक मालवणकर दोघेजण त्यांचा मार्च महिन्यात येणारा वाढदिवस केक शीतपेय देऊन अपंगालयातील सर्व रहिवाशांबरोबर साजरा करत आहेत. रितसर औक्षण, केक कापून वाढदिवस साजरा झाला. अपंगालयातील रहिवासी मंगला साठे आजी यांनी गाणे म्हटले मनोगत व्यक्त केले. उषा शेजवलकर आजींनी मनोगत व्यक्त केले. शकुंतला देसाई आजी यांनी 'मोगरा फुलला' हे गीत म्हटलं. निर्मला जोशी आजी यांनी स्वत: एक कविता करून ती आरतीच्या चालीत सादर केली. पद्मावती ठाणेदार आजी भारती मुश्रीफ यांनीही अनुक्रमे मनोगत गाणे सादर केले. डॉ.श्री.कुमार यांनीही आपल्या डॉक्टर होण्यात भरारीचा मोलाचा हात असल्याचं नमुद केलं. मनालीने नाच सादर केला. साऱ्यांच्या आग्रहाखातर विनायकने 'या जन्मावर' हे डॉ.अंजली आपटे यांनी 'कल्पवृक्ष कन्येसाठी' हे गीत सादर केलं.

           

खरा सरप्राईज कार्यक्रम सादर झाला तो त्यानंतर. अपंगालयातील रहिवासी सेवकवर्ग यांनी स्वत:च्या खाऊच्या पैशातून वर्गणी काढून रक्कम जमवली होती, ती होती तब्बल चार हजार रुपये. आजच्या काळाची असलेली गरज म्हणजे अशी अपंगालय ज्येष्ठालय आणि यात असलेला भरारीचा पुढाकार पाहून ती सारी रक्कम भरारीच्या नव्या जागा इमारतीसाठी भरारीच्या अध्यक्षांना सुपूर्द केली आणि आपला खारीचा वाटा उचलला.

भरल्यापोटी देणगी देणारे भरारीने भरपूर पाहिलेत परंतु कष्टकरी वर्गातून आलेल्या सेवकवर्गाने वर्गणी काढून एवढी रक्कम भरारीला देणगी देण्याचा प्रसंग आम्ही प्रथमच अनुभवला. समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या मनात भरारीने आत्मियतेचे स्थान मिळवल्याबद्दल भरारीचा परिवार कृतार्थ झाला.

या देणगीला हातभार लावणारा सेवकवर्ग -

1) लीला शिंगोळे     2) जयश्री बांदेकर     3) रंजना शिरसाट     4) वैजयंती महाडीक     5) जयश्री हगवणे     6) लता धोत्रे

7) सरला बोडके     8) मिलिंद गावडे     9)  संध्या अहिरे     10) कांता जाधव     11) शिला शिरसाट     12) रमेश गावडे

13) मंगला पीलेवार     14) कुसुम साळवी     15) विमल भोईर                     

              -- मृगा गोरे, जयश्री बांदेकर

प्रार्थना

 गणेश नगर येथील चर्च मधील श्री.डिमेलो यांनी शनिवार, दिनांक 29 मार्च 2014 रोजी ख्रिश्चन धर्माप्रमाणे अपंगालयातील रहिवाशी सेवक वर्ग यांच्या खुशालीसाठी अपंगालयात येऊन प्रार्थना केली.

  -- मृगा गोरे, जयश्री बांदेकर

 

 

नववर्ष  स्वागत यात्रा

आज पहाटे 3 वाजल्यापासून अपंगालयाला जाग आली होती. स्वागत यात्रेत सहभागी होणाऱ्या सदस्यांची तयारी चालली होती. विक्रम आणि विपुल वैद्य 5.30 च्या ठोक्याला 3 टेम्पो घेऊनच अपंगालयात हजर झाले. तोरणे  बॅनर वगैरे लावून टेम्पो सजवले होते. डॉ. अंजली आपटे निवास बरोबर 6 वाजता अपंगालयात आल्या. टेम्पोमध्ये सर्वांना बसण्यासाठी खुर्च्या ठेवण्यात आल्या. डॉ.आपटे मॅडमच्या मार्गदर्शनाखाली अपंगालयातील एक सेवक मिलींद उर्फ पिंटया याच्या मदतीने निवास, विक्रम विपुल यांनी मिरवणूकीला जाणाऱ्या सदस्यांना गाडीत नीट आरामात बसविले. आज्यापण नवीन साडया, नथी, कानातले वगैरे घालून तयार झाल्या होत्या. 95 वर्षांच्या सामंत आजीपण मिरवणुकीत सहभागी झाल्या सर्वात तरुण 32 वर्षाचा सुबोध तर आम आदमीची टोपी गॉगलमध्ये उठून दिसत होता. 12 वर्षाचा संसार होऊनसुध्दा नवविवाहित जोडप्याप्रमाणे विनायक गीतांजली, वैद्य काका, विवेक जोशी आपापल्या अपंगांच्या गाडया घेऊन भागशाळा मैदानापासूनच स्वागतयात्रेत सहभागी होते संध्या प्रधान सविता आपटे यापण आपले पाय दुखतात हे विसरून सुरुवातीपासून समारोपापर्यंत हजर होत्या.

डॉ. अंजली आपटे सीमा जोग तीनही टेम्पोंसह दीनदयाळ रोड येथे यात्रेत सहभागी झाल्या. मिरवणूक ढोल, ताशे, झेंडा पथक यासह वाजत गाजत चालली होती. मीना देढिया, राजेश वोरा, सौ. रेखा बेजकर हे ही आपापल्या गाडयांसह मिरवणूकीत सहभागी झाले. प्रदीप मेहता हे पण सहभागी झाले. पुढे नीता कोपरकर अपर्णा मोडक या देखील मिरवणूकीत सहभागी झाल्या. पोलीस ऑफिसर, डोंबिवलीतील सर्व पक्षांचे नेते, सामाजिक संस्थांपासून ते सामान्य जनांपर्यंत सगळेच जण भरारीच्या सदस्यांचे कार्यकर्त्यांचे कौतुक करीत होते लागेल ती मदतही करीत होते.

           

गुढीपाडवा म्हणजे काय तर सरत्या वर्षातील घटनांचा विचार करून चुकांची दुरुस्ती नव्या चांगल्या विचारांची कास धरून त्याला कृतीची जोड देणे. शिशीरात जशी पानगळ होते, पण वसंतात जसा मोहोर परत डवरतो सगळीकडे उत्साहाचे वातावरण पसरते त्याप्रमाणे उदासीनतेची, नकारात्मक विचारांची कात टाकायची आपल्या व्यक्तिगत, सामाजिक जाणिवेची जागृती करून माणुसकीची, आपल्या अस्तित्वाची गुढी उभारायची. अशा या नववर्षाच्या स्वागतयात्रेतून आपणही समाजाचा एक घटक आहोत हे सिध्द करायचे.

स्वागत यात्रा उत्साहात पार पाडून तीनही टेम्पोतील सदस्य अपंगालयात परत आले. तेथे त्यांना उतरवून घ्यायला प्रसाद जठार, विक्रम वैद्य निवास हे कार्यकर्ते हजर होतेच. सर्व सदस्य अपंगालयातील गुढीचे दर्शन घेऊन आत आले. सर्व जण खरेच खूप उत्साहात आनंदात होते. आज मिरवणुकीत सामील झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. कार्यकर्त्यांच्या मदतीशिवाय हे अशक्य आहे.

-- सीमा जोग, डॉ.अंजली आपटे