'भरारी' संस्था 'भरारी' चे सेवाव्रत अधिक माहिती अपेक्षित सहभाग संपर्क साधा
 

 

 

    अपंगालय   

अपंगालय.... आत्मविश्वासाने जगण्याचे बळ देणारे घर!

अपंगालय-ज्येष्ठालय हा 'भरारी' चा एक मुख्य प्रकल्प आहे. शारीरिक हालचालींवर खूपच मर्यादा आहेत असे अपंग आणि वृध्दापकाळाने अंथरुणावर खिळलेले रुग्ण यांची काळजी घेणारे एक केंद्र असावे अशी कल्पना संस्थेच्या स्थापनेपासूनच होती. त्यातूनच अपंगालयाची कल्पना पुढे आली. पाच वर्षांपूर्वी डोंबिवलीच्या डॉ. (सौ) तारा नाईक यांनी आपले दोन फ्लॅट संस्थेस या कामासाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून देऊ केले आणि ही कल्पना साकार झाली. तेथे काही वर्षे झाल्यानंतर 'भरारी'चे अपंगालय-ज्येष्ठालय सध्या साईधारा टॉवर्स, मानपाडा, डोंबिवली (पूर्व) येथे भाडयाच्या जागेत सुरू आहे. सध्या असणारी जागा ही हवेशीर, प्रशस्त व सर्व सोयींनी युक्त आहे. सध्या या ठिकाणी ३०-३ अपंगांची व्यवस्था आहे.

'भरारी'च्या पॅनेलवरील डॉक्टर्स इच्छुक अपंगांची अथवा रुग्णांची तपासणी करतात त्यानंतर काही वैद्यकीय चांचण्या करून घ्याव्या लागतात आणि नंतरच अपंगालयातील प्रवेशाचा निर्णय घेण्यात येतो. याबाबत अपंगालयाच्या समितीचा निर्णयच अंतीम असतो. दाखल होत असलेल्या अपंगाची अथवा रुग्णाची शारीरिक अवस्था लक्षात घेऊन मासिक शुल्क, अनामत रक्कम आणि अन्य शुल्काचे निर्धारण केले जाते. अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधा.

अपंगालयाची ठळक वैशिष्टये :

bullet

आहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने देण्यात येणारे उत्तम पौष्टिक जेवण.

bullet

दूरचित्रवाणी, वर्ल्डस्पेस रेडिओ, म्युझिक सिस्टिम, पुस्तके, बैठे खेळ अशा मनोरंजनाच्या सोयी.

bullet

मदतीस तत्पर असा सेवकवर्ग.

bullet

तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट.

bullet

वैद्यकीय सुविधा.

bullet

अपघात, पक्षाघात यामुळे तात्पुरते अपंगत्व आलेल्यांचीही व्यवस्था.

bullet

कायम अपंगत्व असलेल्यांची तात्पुरती व्यवस्था.

bullet

वैद्यकीय उपचारां दरम्यान तात्पुरती व्यवस्था.

bullet

डे केअर सेंटर