अपंगालय
अपंगालय.... आत्मविश्वासाने
जगण्याचे बळ देणारे घर!
तहहयात सभासद,
देणगीदार,
जाहिरातदार तसेच हितचिंतक,
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
अपंगालय-ज्येष्ठालय
हा
'भरारी'
चा
एक
मुख्य
प्रकल्प
आहे.
'भरारी'चे
अपंगालय-ज्येष्ठालय
सध्या साईधारा टॉवर्स,
उंबार्ली
रोड,
मानपाडा-माणगाव
(विद्यानिकेतन
शाळेसमोर)
कल्याण
शीळ
रोड,
डोंबिवली (पूर्व) येथे भाडयाच्या जागेत सुरू आहे.
सध्या असणारी जागा
ही हवेशीर,
प्रशस्त व
सर्व सोयींनी युक्त आहे.
परंतु
आपल्या
संस्थेच्या
स्थापना
दिवसापासूनच
आपण
एक
स्वप्न
उराशी
बाळगलं
होतं.
संस्थेची
स्वतःच्या
मालकीची
जागा
असावी.
अव्याहत
चालू
असलेल्या
प्रयत्नांना
अखेरीस
यश
आलं.
नुकतीच
संस्थेने 19.6
गुंठे मोकळी
जागा मौजे नाऱ्हेन,
तलावाजवळ,
तळोजा
काँक्रीट रोड येथे विकत घेतली आहे. लवकरच तेथे आपली
स्वत:ची वास्तू उभारावयाची आहे. हा प्रकल्प पूर्ण
करण्यासाठी मोठया निधीची आवश्यकता आहे. म्हणूनच आम्ही सर्व
सभासद,
हितचिंतक व
देणगीदारांना अधिकाधिक मदतीसाठी आवाहन करीत आहोत.
ही
मदत
आपण
स्वतःतर्फे
तसेच
आपल्या
मित्रपरिवारातर्फे
जमा
करून
देऊ
शकता.
हा
प्रयत्न
संस्थेच्या
विधायक
कार्यात
आपली
अमूल्य
मदत
ठरू
शकते.
रक्कम
चेकद्वारे
अथवा
डिमांड
ड्राफ्टद्वारे
दिल्यास
चेकवर
अथवा
डिमांड
ड्राफ्टवर
''भरारी
अ.वि.संस्था''
असे
लिहावे.
सोबत
वेगळया
कागदावर
स्वतःचा
सविस्तर
पत्ता
लिहावा
ज्यामुळे
संस्थेस
रकमेची
पावती
आपणास
पाठवणे
सोयीचे
होईल.
आपण दिलेल्या देणग्यांना आयकर कायद्याच्या कलम
80-जी अंतर्गत
सवलत प्राप्त आहे.
संस्थेने
केलेले
हे
आवाहन
म्हणजे
प्रेमाचा
आग्रह
आहे.
धन्यवाद!!!
श्री.विनायक
मालवणकर सौ.प्रतिभा
भावे डॉ.सौ.अंजली आपटे
अध्यक्ष
सचिव
कार्याध्यक्ष
भरारीने नुकत्याच घेतलेल्या मौजे नाऱ्हेन येथील जागेची
छायाचित्रे

 |