 |
आपला सहकार्याचा हात हवा...
'भरारी'चे कार्य आपल्यासारख्यांच्या आर्थिक सहकार्यावरच
चालते. म्हणूनच, या सेवाकार्यात आपलाही देणगी रूपाने सहभाग
असावा...
आर्थिक सहकार्य
 |
आपल्या सुहृदांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण देणगी
देऊ शकता. |
 |
आप्तेष्टांचे वाढदिवस, लग्न-मुंजीसारखे प्रसंग,
आपल्या आयुष्यातील एखादा विशेष दिवस अशा कोणत्याही
मंगलसमयी आपण देणगी देऊन आपला आनंद द्विगुणित करू
शकता. |
 |
एखादी ठराविक रक्कम मासिक, वार्षिक आवर्ती
स्वरूपातही 'भरारी'साठी देऊ शकता. |
 |
कोणत्याही रूपात आपण दिलेले हे सहकार्य सत्कारणी
लागेल आणि आपल्याला आनंदच देईल. 'भरारी' साठी
दिलेल्या सर्व देणग्यांना आयकर कायद्याच्या
८०-जी
कलमानुसार आयकर सवलत मिळू शकते. |
वस्तूरूपाने सहकार्य
 |
लवकरच सुरू होत असलेल्या अपंगालयाच्या उभारणीसाठी
आपण बांधकाम साहित्य देऊ शकता. |
 |
अपंगांसाठी कुबडया, तिचाकी, औषधे, रुग्णोपयोगी
साहित्य अशी मदतही करू शकता. |
 |
अपंगालयासाठी धान्य, किराणा सामान, फर्निचर,
मनोरंजनाच्या वस्तू, पुस्तके अशी मदतही अपेक्षित
आहे. |
 |
अपंगालयासाठी जुन्या वापरलेल्या साडया,
पडदे,
बेडशीटस् देखील स्विकारण्यात
येतात. हे सर्व कपडे चांगल्या अवस्थेत आणि शंभर
टक्के सुती असावेत. |
थोडक्यात, आपली मदत कोणत्याही स्वरूपात असो आपण एखाद्या
अपंगाच्या जीवनात आनंद फुलवू शकतो ही भावना महत्त्वाची! |
 |