'भरारी' संस्था 'भरारी' चे सेवाव्रत अधिक माहिती अपेक्षित सहभाग संपर्क साधा
 

 

   'भरारी' चे आजीव सभासद व्हा!  

सामाजिक कार्याची आवड असलेल्या कोणासही 'भरारी'चे आजीव सभासद होता येते.

आजीव सभासदत्वातून जमा होणारी रक्कम ही संस्थेची गंगाजळी म्हणून ठेवण्यात येते व त्याच्या व्याजातून अपंग विद्यार्थ्यांना तसेच अपंगांच्या सर्वसामान्य मुलांनाही शैक्षणिक मदत करण्यात येते. गरजूंना तिचाकी, व्हीलचेअर्स, औषधोपचार, श्रवणयंत्रे अशा वस्तूही पुरविण्यात येतात.

आजीव सभासदांची संख्या वाढल्यावर अधिकाधिक गरजूंना अशी मदत करणे शक्य होईल. म्हणूनच, आपणही आजीव सभासद व्हावे आणि आपल्या आप्तेष्ट, परिचितांनाही सभासदत्व स्विकारण्याचे आवाहन करावे ही विनंती.

आजीव सभासद होण्यासाठी....

bullet

अपंग भारतीय नागरिकांसाठी आजीव सभासद वर्गणी रु.११०० (रुपये अकराशे मात्र).

bullet

अव्यंग भारतीय नागरिकांसाठी आजीव सभासद वर्गणी रु.३००० (रुपये तीन हजार मात्र).

bullet

अनिवासी भारतीय आणि परदेशी नागरिकांसाठी सभासद वर्गणी ५०१ अमेरिकन डॉलर्स.

या पानावर दिलेल्या लिंकवरून आजीव सभासदत्वासाठीचा अर्ज डाऊनलोड करून घ्यावा व त्याची प्रिंट काढून भरलेला अर्ज आणि सभासद वर्गणी खालील पत्त्यावर पाठवावी. चेक/डिमांड ड्राफ्ट 'भरारी अस्थिव्यंग विकलांग संस्था, डोंबिवली' या नांवाने काढण्यात यावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

 'भरारी अपंगालय'

'साईधारा टॉवर्स', मानपाडा-माणगांव,

विद्यानिकेतन शाळेजवळ, प्रिमियर कंपनीसमोर,

डोंबिवली (पूर्व) जि.ठाणे

महाराष्ट्र-भारत  ४२१ २०४.

 दूरध्वनी क्र. : + ९१-०२५१-२८७९६६