|
'भरारी' सेवाकार्यात सहभागी व्हा....
आपण कशा प्रकारे सहभागी
होऊ शकाल?
|
'भरारी' संबंधी समाजात, विविध संस्थांमध्ये माहिती
द्या. |
|
आपल्याला शक्य तेथे 'भरारी'च्या वतीने उपलब्ध
असलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी प्रयत्न करा. |
|
'भरारी'साठी आर्थिक मदत उपलब्ध करून द्या.
(स्मरणिकेसाठी जाहिराती, कार्यक्रमांसाठी प्रायोजक
इत्यादि) |
|
प्रसिध्दी माध्यमांमधून 'भरारी' च्या कार्याविषयी
लेख, माहिती देण्याचा प्रयत्न करा. |
|
आपले मित्र, परिवार, सहकारी यांच्यात आजीव
सदस्यत्व स्विकारण्यासाठी प्रचार करा. |
|
'भरारी' च्या संकेतस्थळाची (वेबसाईट) ची माहिती
आपल्या परिचयाच्या लोकांना द्या. |
|
आपल्या स्वत:च्या ई-मेल मध्ये अथवा
संकेतस्थळामध्ये 'भरारी'च्या वेबसाईटची लिंक द्या. |
|
'भरारी'चे कार्य वाढविण्यासाठी आपल्या सूचना कळवा. |
'भरारी' चे कार्यकर्ते
व्हा !
|
अतिशय तळमळीच्या आणि सेवाव्रती कार्यकर्त्यांच्या
संघात काम करण्याचा आनंद घ्या. |
|
'भरारी'च्या अपंग सहली, स्पर्धा, वर्धापन दिन,
शिबीरे यामध्ये काम करण्यासाठी अवश्य वेळ काढा. |
|
अपंगालयातील बांधवांशी संवाद साधण्यासाठी, त्यांना
मदत करण्यासाठी, त्यांचे मनोरंज करण्यासाठी अवश्य
वेळ द्या. |
|
संस्थेचा पत्रव्यवहार, कार्यालयीन कामे, बाहेरील
धावपळीची कामे यासाठी सहकार्य करा. |
|
संस्थेच्या शासकीय कार्यालयातील कामांसाठी, इतर
संस्थांशी संबंधित कामांसाठी वेळ द्या. |
आपण कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असाल, आणि कितीही कमी
अथवा जास्त वेळ देऊ शकत असाल तरीही तुम्ही 'भरारी' च्या
कार्यासाठी हवे आहात. |
|